अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्यास कारावास

Thane news,

ठाणे : राहत्या इमारतीच्या पार्कीगमध्ये खेळणा:या आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणा:या नवीमुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक श्रीपाद कांबळे (61) याला शनिवारी ठाणो जिल्हा न्यायालयातील विशेष पॉक्सो न्यायाधीश कविता शिरभाते यांनी दोषी ठरवून तीन वर्ष सक्षम कारावास आणि सहा हजार रुपये अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी काम पाहिले. तसेच सद्यस्थितीत आरोपी हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. ही घटना 19 एप्रिल 2016 रोजी नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.

पिडीत मुलगीही राहत्या इमारतीच्या पार्कीगमध्ये सकाळच्या सुमारास सायकल चालवत होते. त्यावेळी त्याच इमारतीत राहणारा आरोपी कांबळे हा तेथे आला. त्याने पिडीत मुलीला जवळ बोलवून तिचा विनयभंग केला.हा प्रकार पिडीत मुलीने मोठय़ा बहिणी मार्फत तिच्या आईला सांगितला. त्यानुसार, 20 एप्रिल 2016 रोजी याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पॉक्सो अॅक्ट 12 प्रमाणो गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या त्या तक्रारीत आरोपीने अशाप्रकारे मुलीवर तीन ते चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. हा खटला विशेष पॉक्सो न्यायाधीश शिरभाते यांच्या न्यायालयात आल्यावर विशेष सरकारी वकील मोरे यांनी तीन साक्षीदार आणि पिडीत मुलीच्या साक्ष याच्या आधारे पॉक्सो 6 आणि 7 लावण्याची मागणी केली. त्यावेळी आरोपींच्या वकील त्याला विरोध दर्शवला.

याचदरम्यान, आरोपीवर पॉक्सो अॅक्ट 7 आणि 8 लावण्यात आले. शनिवारी झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायाधीश शिरभाते यांच्या समोर सरकारी वकीलांनी युक्तीवादासोबत उच्च न्यायालयातील न्यायनिर्णय सादर केले त्यानुसार आरोपीना दोषी ठरवून भादवी कलम 354 प्रमाणो तीन वर्ष आणि दोन हजार रुपये तसेच पॉक्सो 8 मध्ये तीन वर्ष आणि दोन हजार रुपये दंड तर पॉक्सो 12 मध्येही तीन वर्ष आणि दोन हजार रुपये अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास 15 दिवसांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्याच्या तात्कालीन पोलीस निरीक्षक एस.ए.राजगुरू आणि सहायक पोलीस निरीक्षक गजळ यांनी तपास केला.