देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या 5 वर्षांची प्रभावशाली कारकीर्द

Fadnavis

मुंबई :- महाराष्ट्राचे तरूण आणि उर्जावान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 5 वर्षांची दीर्घकाळ अशी मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द पूर्ण होत आहे. त्यांच्यासाठी हा प्रवास अगदी सहज होता. त्यांनी स्वत:ला सर्वच बाबतीत अधिक बुद्धिवान, सक्षम, स्वच्छ आणि प्रामाणिक मुख्यमंत्री असल्याचे सिद्ध केल्याचे सर्वांनी मान्य केले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस शब्दाला जागणारा म्हणून सर्वत्र ओळखले जातात. त्यांची 5 वर्षांची कारकिर्द संपायला आली आहे. त्यांच्या उपलब्धींपैकी काही प्रमुख उपलब्धी सिद्ध करतात की ते सर्वात लायक मुख्यंत्री का आहेत. मुख्यंत्री फडणवीस यांच्या कारकीर्दीतील सर्वाधिक प्रमुख उपलब्धी म्हणून मराठा आरक्षण आणि जलयुक्त शिवार योजना म्हणाव्या लागतील. जलयुक्त शिवारमुळे तर राज्याच्या भूगर्भातील पातळीत लक्षणीय वाढ झाली.

याशिवाय त्यांच्या काळात राज्यात एकूण गुंतवणूक 375,045 कोटीची झाली. शहरी भागात 6260 कोटी रुपये सरकारने मूलभूत सुविधांवर खर्च केले. वनविभागानेसुद्धा वेगवेगळ्या वृक्ष लागवडीच्या योजनांच्या माध्यमातून सुमारे 50 कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा गाठला आहे.

दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या राज्यातील मेट्रो रेल्वेच्या कामालासुद्धा गति प्राप्त झाली असून 298 किलोमीटरचा मेट्रोच्या मार्गाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत सुमारे 765,528 घरे बांधण्यात आली आहे. सुमारे 1 लाख 13 हजार 200 दिव्यांगांना लाभधारकांचे प्रमाणपत्र मिळाले असून त्यांनाही घरे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सर्वाधिक उल्लेखनीय बाब म्हणजे 701 किलोमीटर लांबीचा नागपूर-मुंबई समृद्धि एक्सप्रेस महामार्ग आहे. जिथपर्यंत महसूल विभागाचा संबंध आहे, 7/12 चे डिजीटायजेश हा सर्वात प्रमुख टप्पा होता तो पूर्ण करण्यात आला आहे. ‘आपले सरकार’ या ऑनलाईन पोर्टलने 403 ऑनलाईनसेवा प्रदान केल्या आहेत आणि 14 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. तर राज्यातील 24 लाख रुग्णांसाठी अटल महाआरोग्य योजना लाभदायी ठरली आहे. मुख्यमंत्री आरोग्य तपासणी अंतर्गात 552 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे. विशेष महत्वाची बाब म्हणजे देशातील आरोग्य सेवेच्या बाबतीत महाराष्ट्राने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

त्याचप्रमाणे राज्यातील 66458 शाळांचे डिजीटायझेशन करण्यात राज्य सरकार यशस्वी झाले आहे. तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 8900 किलोमीटर रत्याची कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. एक आणखी सरकारची उपलब्धी म्हणजे जलयुक्त शिवार योजना यामुळे सुमारे 38.95 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे आणि राज्यातील 5270 धरणे स्वच्छ करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात यशस्वी अशी ही सिंचनाची योजना असून यात 609018 प्रकरणे पूर्ण करण्यात आली आहे.

राज्यातील भाजप सरकारने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना यासारख्या अनेक योजना राबविल्या आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र एक असे राज्य आहे की ज्याने देशभरात स्टार्ट-अप कल्चरला प्रोत्साहित केले आहे. देशभरात महाराष्ट्राचा शिक्षण क्षेत्रात तिसरा क्रमांक आहे.

राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रातही उल्लेखनीय बदल झाल्याचे दिसून येत आहे. 53700 कोटी रुपयांच्या निधीचा उपयोग थेट शेतक-यांना मिळाला आहे. पीक विमा योजनेअंतर्गत सुमारे 2.70 कोटी शेतक-यांनी अर्ज केला होता आणि प्रति हेक्टर 32,216 रुपये प्रमाणे लाभ देण्यात आला आहे. मागील 5 वर्षांच्या काळात राज्यात अन्न सुरक्षा योजना आणि कायद्याची काटेकोरपणे सक्षमरित्या अंमलबजावणी करण्यात आली आहे. राज्यभरात कृषी क्षेत्रात 1 लाख 50 हजार कोटी रुपयांच्या निधीची गुंतवणुक करण्यात आली आहे आणि कृषी मालाच्या निर्यातीच्या माध्यमातून 22170 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जवळपास 26.90 लाख टीएमसी पाण्याचे संवर्धन करण्यात आले आले. वन कायद्याच्या माध्यमातून अदिवासी समाजाची सुमारे 33.23 लाख ऐकर जमीन सुरक्षित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने राज्यातील पर्यटन क्षेत्रासाठी 3442 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यात ऐतिहासिक, सांसकृतिक आणि धार्मिक पर्यटनाच्या विकासाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेलाही मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून सुमारे 3654220 कुटुंब लाभान्वित झाले आहे. त्याचप्रमाणे डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना कल्पकता सिद्ध करणारी ठरली असून त्याचा लाभ अनेक माता व बालकांना मिळाला आहे.