शरद पवारांच्या कार्याने प्रभावित; अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

Sharad Pawar- Priya Berde

पुणे :   प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक मराठी कलावंतांनी आज राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. यामध्ये कलाकार, तंत्रज्ञ यांचा समावेश आहे.

शरद पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादीची निवड केल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितले आहे. सक्रिय राजकारणात प्रवेश करून महिला कलाकार, लोककलावंत, तंत्रज्ञ यांच्यासाठी काम करण्याचा मानस यावेळी प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केला. “मी स्वतःला नेता म्हणणार नाही. सगळे जण आम्ही  एकत्र काम करणार आहोत.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाविना आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नका: शरद पवार

अभिनय सुरूच राहील, निर्माती म्हणूनही काम करणार आहे.” असं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. “विधानपरिषद वगैरे डोक्यात नाही. मला तळागाळात काम करायचे आहे.

तसेच, पक्षश्रेष्ठींनी विचार केला तर बघू. ” असंही प्रिया बेर्डे म्हणाल्या. तर, प्रिया बेर्डे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशावर सुप्रिया सुळे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांना कलाकारांची कदर म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश : प्रिया बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे हे आजही आमच्या मनात आहेत. त्यांचे कार्य आपण चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहात, अशा भावना यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER