महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणे अशक्य : नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई : ‘राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारच्या कामावर समाधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे अशक्य आहे.’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले. खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी म्हटले की, “सरकार टिकणार नाही, फाटाफूट होऊन भाजपाचीच सत्ता येईल.” जवळपास १५ महिन्यांनंतर त्यांनी बाजा वाजवणे बंद केले. पुन्हा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहेत. याशिवाय भाजपाकडे कोणताही पर्याय नाही, पण हे अशक्य आहे. कोणालाही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

नवाबांचा काँग्रेसला टोला
मुख्यमंत्र्यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्याप्रकरणात पत्रकार परिषद घेतली. डेलकरच्या सुसाईड नोटमध्ये बऱ्याच लोकांची नावे आहे. यात पोलिसांचा तपास सुरू आहे. सुसाईड नोटमध्ये भाजपा नेत्यांचाही समावेश आहे. सत्य काय ते लवकरच समोर येईल. मात्र, हा तपास रोखण्यासाठी दबाव आणू नका. यंत्रणांना त्याचे काम करू दिले पाहिजे, असा टोला नवाब मलिक यांनी काँग्रेसला लगावला. तसेच मनसुख हिरेन प्रकरणाचेही सत्य लवकर समोर येईल. कोण काय बोलते, यावर विश्वास ठेवू नका, असेही नबाव मलिक यांनी म्हटले.

नारायण राणे राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार
शनिवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही. नारायण राणे केंद्रातील नेत्यांची भेट घेणार आहेत. यात ते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार असल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER