डिजिटल पेमेंट सेवा मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल; आरबीआयची घोषणा

मुंबई : डिजिटल पेमेंट सर्व्हिसेस सुदृढ करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) २४ तासांचा हेल्पलाईन नंबर सुरू करणार आहे. आरबीआयनुसार, सप्टेंबरपर्यंत देशभरात एक केंद्रीकृत हेल्पलाईन नंबर आणला जाईल. जेणेकरून ग्राहकांना डिजिटल पेमेंटबद्दलची माहिती मिळू शकेल आणि त्यांच्या तक्रारी नोंदवता येतील.

ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सध्या बँकिंग, नॉनबँकिंग फायनान्स कंपन्या आणि डिजिटल व्यवहारात तीन वेगवेगळे लोकपाल तयार करण्याची योजना सुरू आहे. या तिघांसह एक राष्ट्र, एक लोकपाल यंत्रणा कार्यान्वित होईल. या उपक्रमाची उद्दिष्टे म्हणजे ग्राहकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. आर्थिक धोरण जाहीर करताना शुक्रवारी आरबीआयने ही माहिती दिली.

आरबीआयनुसार, ऑथराइज्ड पेमेंट सिस्‍टम्सचे ऑपरेटर आणि पार्टिसिपेंट्सच्यावतीने प्रदान केलेली उत्पादने विविध प्रकारच्या अक्टिव्हिटी करतात. बर्‍याचदा हे उपक्रम आउटसोर्स केले जातात. अशा आऊटसोर्स सेवा प्रदान करणार्‍यांसाठी सिस्टमचा धोका वाढतो. हा धोका लक्षात घेता आरबीआय मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. डिजिटल पेमेंट सेवा बळकट करण्यासाठी आरबीआयने हे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER