राज ठाकरे पुढील रणनीती ठरवणार ; मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक

Raj Thackeray

मुंबई :- विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेचे महानाट्यच रंगले होते. या सगळ्यांमध्ये मनसेने अलिप्त राहणेच पसंत केले.

मात्र, राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे एक्टीव्ह झालेली पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री शपथ ग्रहन सोहळ्या दिवशीच मनसे नेते राज पूत्र अमित ठाकरे यांनी नवी मुंबईत मोर्चा काढला होता. तर, सरकार सत्तेत आल्यानंतर ठाणेकरांना टोलमुक्त करा यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन केले होते. एकंदरीतच ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर दुसरे ठाकरे अधिक एक्टीव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ही बातमी पण वाचा : …यासाठी तमाम मराठ्यांनी ‘पानिपत’ बघावा; राज ठाकरेंच आवाहन

यंदाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षासाठी पक्षाला मतदान करावं असं आवाहन केलं होतं. मात्र युती आणि आघाडीच्या तुलनेत मनसेला राज्यात केवळ १ जागा जिंकता आली. मनसेने या निवडणुकीत १०० च्या आसपास उमेदवार उभे केले होते. त्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे राजू पाटील आमदार म्हणून निवडून आले. परंतु, मनसेचा एकमेव आमदार राज्यात निवडून आला असला तरी मुंबई, ठाणे पट्ट्यात काही जागांवर मनसेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत. विक्रोळी, मुलुंड, मागाठणे, भिवंडी ग्रामीण, दादर-माहिम, ठाणे, शिवडी, डोंबिवली आणि कोथरुड या मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमाकांची मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने भाजपाच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीविरोधात आक्रमक प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात न उतरवता राज ठाकरेंनी भाजपाविरोधात प्रचारात रंगत आणली होती.

… तर सर्वांनी राजीनामे द्या; अजित पवार संतापले

विधानसभेच्या वेळी मनसे आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा होती. परंतु तसे न होता मनसे स्वबळावर लढली मात्र, मात्र काही जागांवर आघाडीकडून मनसेच्या उमेदवाराला ताकद देण्याचं काम पडद्यामागून झालं होतं.

निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलेलं असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेचं सरकार राज्यात आलं आहे. सरकारच्या बहुमत चाचणीवेळीही मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती चर्चा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आजच्या बैठकीत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.