पवारांच्या त्या सभेचे गुपित अखेर सुप्रिया सुळेंनी सांगितले; म्हणाल्या…

Supriya Sule - Sharad Pawar

नवी मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या (Sharad Pawar) साताऱ्यातील त्या सभेचे  गुपित अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सांगितले. आज सुप्रिया सुळे यांनी नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मंचावर मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात दीड वर्षापूर्वी शरद पवारांच्या पावसात झालेल्या सभेचे गुपित सांगितले.

त्या सभेबाबत माहिती देताना सुळे म्हणाल्या की, यावेळी साताऱ्यातील त्या सभेला शरद पवार नाही तर शशिकांत शिंदे जबाबदार आहेत. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. साताऱ्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे सभा रद्द करण्याचा  विचार सुरू  झाला. संध्याकाळच्या सुमारास मला शिंदे यांचा फोन आला. मी प्रचारात होते.  त्यामुळे त्यांचा फोन घेतला नाही. नंतर त्यांना फोन केल्यावर ते म्हणाले की, ताई मी सॉरी बोलण्यासाठी फोन केला होता. मला प्रश्न पडला की, साहेब तर साताऱ्यात आहेत. मग हे असं का बोलत आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की, ताई सभा झाली, पवारसाहेब पूर्ण भिजले. मी कपाळाला हातच लावला. मी म्हटलं, अहो असं काय करताय.

माझे वडील ८० वर्षांचे, पायाला जखम झाली आहे. तेव्हा ते म्हणाले, मी आणि साहेबांनी ठरवलं की सभा करायचीच. मग काय झालं, असं विचारल्यावर ते म्हणाले की, काही नाही सभा झाली. साहेब भिजले. आता साहेब तयार झालेत आणि माझ्या वाढदिवसाचा केक कापतोय. हे सगळं ऐकून मी पूर्ण शॉक होते, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणाचं चित्र पालटवणारी साताऱ्यातील ती सभा ही शशिकांत शिंदे यांनी घडवून आणल्याचं आज सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER