मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये महत्वपूर्ण चर्चा

CM Thackeray and Pawar regarding Maratha reservation.jpg

मुंबई : सध्या मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण टिकवून ठेवण्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas aghadi) अपयशी ठरल्याचा आरोप मराठा संघटनांसह विरोधी पक्षाने केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून आरक्षण देण्यासंदर्भात जोरदार हालचालीसुरू झाल्या आहेत. आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे वर्षा बंगल्यावर पोहचले. या दोघांमध्ये मराठा आरक्षण, अधिकाऱ्यांच्या बदल्या या काही विषयांवर महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहचले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ४५ मिनिटं चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. या दोघांमध्ये ४५ मिनिटं चर्चा पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत मुंबईत उद्या होणाऱ्या मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, जीएसटीचा केंद्राकडून येणारा परतावा आणि मुख्य म्हणजे राज्यातील आयएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर असलेल्या विषयांवर महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER