सातव्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नितीश कुमार सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Nitish Kumar

पाटणा नितीशकुमार यांनी सोमवारी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर नितीशकुमार (Nitish Kumar) त्रिमंडळाची पहिली बैठक आज सकाळी ११.३० वाजता संपन्न झाली. या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत नितीश सरकार यांनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णय घेतला आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत येत्या २३ नोव्हेंबरपासून २७ नोव्हेंबर दरम्यान विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. २५ नोव्हेंबरला विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात येईल. २६ रोजी राज्यपालांचे अभिभाषण आणि २७ तारखेला राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER