कोणतेही दुखणे अंगावर काढू नका; आरोग्यमंत्र्यांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Rajesh Tope Corona

मुंबई :- राज्यात कोरोना विषाणूने (Corona Virus) थैमान घातले आहे. संसर्गाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. ही लाट कधी ओसरणार याचा नागरिकांच्या मनात विचार सुरू आहे. असे असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सर्वसामान्यांना एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज ५० हजारांच्या आसपास नवे रुग्ण सापडत आहेत. यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहेत. राजेश टोपे यांनीही जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ‘थोडी जरी लक्षणे आढळल्यास चाचणी करा आणि अहवाल पॉझिटिव्ह आल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. उपचार करा. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका.’ असा सल्ला राजेश टोपे यांनी दिला आहे. सोबतच, जिल्ह्यातील माझा अभ्यास हेच सांगतो की, उपचार घेण्यास उशीर केल्याने रुग्ण दगावला. म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की, अंगावर दुखणे न काढता त्वरित उपचार करा, असे टोपे यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाची बैठक
राज्यात कडक निर्बंध लावूनही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. असे संकेतही दोन दिवसांपूर्वी आघाडीच्या मंत्र्यांनी दिले होते. यासंबंधी आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

जीवनावश्यक दुकानांवर निर्बंध
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहे, असे असतानाही किराणा दुकानात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. मात्र, आता दुकांनाना सकाळी ७ ते ११ या वेळेतच खुली ठेवण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे.

ही बातमी पण वाचा : नागपुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध ; किराणा व भाजीपाला विक्री सकाळी ११ पर्यंतच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button