राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नाही ; शरद पवारांनी विरोधकांना खडेबोल

Sharad Pawar

मुंबई : राज्यात कोरोना संकटाच्या (Corona crises) पार्श्वभूमीवर विरोधकांनी ठाकरे सरकारला (Thackeray Govt) धारेवर धरले आहे . यापार्श्वभूमीवर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, (Sushant Singh Rajput suicide case) कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना वाद, तसेच नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला झालेला मारहाण यावरून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशी मागणी करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे .

ही बातमी पण वाचा:- मराठा आरक्षणप्रश्नी  राज्य सरकारची भूमिका स्पष्ट : शरद पवार 

राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांना सुनावले आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नवनीत राणा तसेच इतर काही जणांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात राष्ट्पती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER