शरद पवार शेतकऱ्यांसाठी पुन्हा मैदानात ; शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला दर्शविला पाठिंबा

Farmer-Sharad Pawar

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शेतकरी विधेयकांना विरोध करण्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यसभेमध्ये कृषिविषयक विधेयक मांडण्यात आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सभागृहात उपस्थित नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र या प्रश्नावरून होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने संमत करून घेतलेल्या कृषिविषयक दोन विधेयकांविरोधात २५ सप्टेंबर रोजी देशव्यापी शेतकरी आंदोलन होणार आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .

एकीकडे बाजारपेठ खुली केली, मग कांद्यावर निर्यातबंदी का?,” असा सवाल शरद पवारांनी यावेळी केंद्र सरकारला विचारला. इतक्या घाईत दोन्ही विधेयकं एकत्र संमत करण्याची गरज नव्हती असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं असून केंद्राच्या कृषी धोरणात विरोधाभास असल्याची टीका केली.

राज्यसभेत कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी आपण का हजर नव्हतो, याचे स्पष्टीकरणही शरद पवार यांनी दिले. मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीबद्दल मी गेले दोन दिवस राज्य सरकारशी चर्चा करत आहे. मी अनेक कायदे तज्ज्ञांबरोबरही बोललो. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर अपील करणे गरजेचे आहे. त्यासाठी मला मुंबईत थांबावे लागले आणि दिल्लीला जाता आले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER