राज्यात लसीकरणासाठी ‘स्पेशल डे’ पॅटर्न राबविणार; धनंजय मुंडेंचा मानस

Dhananjay Munde

बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यात सर्व लसीकरण केंद्रांवर एक दिवस राखून दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथील लसीकरण केंद्रावर धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

दिव्यांग व्यक्तींना ये-जा करणे, तसेच त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करत सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करावे, याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. एक दिवस राखीव ठेवून दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्याच्या या विशेष मोहिमेची बीड जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्याचा मानस आहे, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button