राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, मदन शर्मा यांनी राज्यपालांकडे केली मागणी

Madan Sharma - Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचे (CM Uddhav Thackeray) व्यंगचित्र ‘शेअर’ केल्याबद्दल शिवसैनिकांनी (Shiv Sena) नौदलाचे माजी अधिकारी शर्मा (Madan Sharma) यांना मारहाण केली होती. मदन शर्मा यांनी आज राज्यपालांची (Governor Bhagat Singh Koshyari) भेट घेतली. भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शर्मा म्हणाले – राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी मी केली आहे.

भाजपाचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) हे देखील शर्मा यांच्या सोबत होते. या गुंडगिरीसाठी महाराष्ट्र सरकारने माफी मागितली पाहिजे. मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कठोर कलम लावा, अशी मागणी केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने महाराष्ट्राची माफी मागावी. या मारहाणीचे समर्थन करणारे अनिल परब (Anil Parab) यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही भातखळकरांनी केली.

मारहाण करताना शिवसैनिक मला आरएसएस आणि भाजपाचा चमचा म्हणत होते. मी माजी नौदल अधिकारी आहे. माझा असून कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. माझ्याबद्दल त्यांच्या मनात कोणी गैरसमज पसरवला आहे हे माहीत नाही, असे शर्मा म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER