महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू ; नवनीत राणांचा पुन्हा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई :राज्यात कोरोनाचे संकट (Corona crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) निशाणा साधला. कोरोनाच्या परिस्थितीवरून नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका करत राज्यात राष्ट्रपती राजवट (Presidential Rule) लागू करा, अशी मागणी लोकसभेत (Lok-sabha) केली आहे.

कोरोना काळात खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची लाखो रुपयांनी लूट होत आहे. ही खाजगी रुग्णालयात होणारी लूट थांबविण्यासाठी आकस्मिक कायदा लागू करावा, विदर्भात ऑक्सिजनची कमतरता आहे. अनेकांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने प्राण गमवावे लागले आहे’, अशी माहिती नवनीत राणा यांनी राज्यसभेत दिली.

तर,’महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या निवासस्थानी असलेल्या ‘मातोश्री’वर बसून फुकटचे सल्ले देत आहे. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी’, खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्यांकडे केली आहे. ‘महाराष्ट्र सरकारने खाजगी दवाखाने मर्यादा 10 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर करावी, पीएम फंडमधून महाराष्ट्र, विदर्भाला भरीव मदत करावी’ अशी मागणीही नवनीत राणा यांनी लोकसभेत केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER