मंत्रालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा, अधिकाऱ्यांची मागणी

Mantralaya - Maharashtra Mantralaya Adhikari Sanghatana

मुंबई : पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) मंत्रालयालाही आपल्या कवेत घेतले आहे. मंत्रालयाच्या महसूल विभागातील आठ कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकाच विभागातील इतके कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्रालय अधिकारी संघटनेच्या वतीने मंत्रालय प्रशासनाला कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. एका निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहे व त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील रुप्णसंख्येतही दरदिवशी दुपटीने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळेच मा.मुख्यमंत्री महोदयांनी राज्यात अनेक सार्वजनिक बाबींवर प्रतिबंध आणण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शासनाने घालून दिलेले कोरोनाचे निर्बध तंतोतंत पाळले जातात किंवा कसे अथवा पाळले जात नसल्यास, सक्तीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तथापि, राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात यातील एकाही बाबीचे पालन होताना दिसत नाही. राज्यभरातील विविध भागांतून येणाऱ्या अभ्यागतांना मंत्रालयात मुक्त प्रवेश आहे. अगदी कोरोना संक्रमित भागातील अभ्यागतांसाठी सुध्दा काहीही निबंध नाहीत. येणाऱ्या अभ्यागतांचे शरीराचे तापमान नोंदणे, ते मास्कचा वापर करतात किंवा नाही याबद्दल कोणतीही यंत्रणा नाही. , अभ्यागतांचे हाताचे निर्जतुकीकरण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा / व्यवस्था अस्तित्वात नसणे, यासारख्या बाबींमुळे मंत्रालयात कोरोनाचा धोका वाढला आहेच, पण मंत्रालयाच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागांमध्ये सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झालेली आहे.

गेल्या २ ते ३ दिवसांत मंत्रीमहोदयांसह मंत्रालयातील विविध विभागातील अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्येने कोरोना बाधित झाल्याचे समजते. सदरचा प्रकार टाळण्यासाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका टळेपर्यंत निर्बंध आणावेत, यासाठी शासनाकडे मागणी करावी, असा मंत्रालयातील अधिकारी सदस्यांकडून संघटनेकडे आग्रह होत आहे तरी, मंत्रालयात कोरोना प्रतिबंधात्मक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अधिकाऱ्यांच्या संघटनेने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER