देशात वायू प्रदूषण नियंत्रण अध्यादेश लागू

Air Pollution Control

नवी दिल्ली : देशातील वायू प्रदूषण नियंत्रणात (Air Pollution Control) आणण्यासाठी अध्यादेश लागू करण्यात आला आहे, अशी माहिती काल, गुरुवारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दिली. सरन्यायाधीश शरद बोबडे (Sharad Bobde) यांच्या अध्यक्षतेखाली न्यायामूर्ती ए.एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमक्ष व्हिडिओ कॉन्फरेंन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी (Tushar Mehta) अध्यादेशासंबंधी माहिती दिली.

शेजारील राज्यात मोठ्या प्रमाणात हिवाळ्यात तण जाळले जातात. दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणात त्यामुळे वाढ होते. शेतक-यांनी शेतातील तण जाळू नये यासाठी शेजारील राज्यांकडून उचलण्यात आलेल्या उपाययोजनांवर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन बी. लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नियुक्त करण्याचा १६ ऑक्टोबरचा आदेश खंडपीठाने सोमवारी रद्द केला होता. वायू प्रदूषणासंबंधी कुठलेही निर्देश देण्यापूर्वी हा अध्यादेश अभ्यासने महत्वाचे असल्याचे मत यावेळी खंडपीठाकडून व्यक्त करण्यात आले. याचिकाकर्त्याने देखील हा अध्यादेश अभ्यासावा, असे निर्देशही खंडपीठाने दिले. येत्या शुक्रवारी याचिकेवर पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER