चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम; उपचाराची गरज- अशोक चव्हाण

Chandrakant Patil - Ashok Chavan

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावं. चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये, असं पाटील म्हणाले. पाटील यांनी केलेल्या विधानावर आता अशोक चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) ‘फुलप्रूफ’तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बेताल विधाने करीत असून त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे. प्रचंड ताणतणावामुळे चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे, असे म्हणत चव्हाण यांनी पाटील यांच्यावर मिस्कील टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button