मानाच्या तुकाराम माळी तालिमीच्या गणेशाचे विसर्जन

Nilofar Azarekar - Ganesh Utsav

कोल्हापूर : कोरोना (Corona) प्रलयाचे दु:ख बाजूला सारत कोल्हापुरकरांनी (Kolhapur) साधेपणाने मात्र अमाप उत्साहात मात्र यंदाचा गणेश उत्सव (Ganesh Utsav) साजरा केला. गणेश चतुर्थीपासून सुरु झालेला मांगल्यांच्या उत्सव समारोपाची सुरुवात आज झाली. मानाच्या तुकाराम माळी तालिमीच्या गणेश पूजन करून तालमीच्या दारातच विसर्जन करण्यात आले. महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते गणेशाची आरती झाली. तालमीच्या दारातच मान्यवरांनी पालखी उचलून श्रींना निरोप दिला.

दरवर्षी सकाळी ९वाजता खासबाग चौक येथून मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केल्यानंतर कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होते. यंदा कोरोना महामारीमुळे विसर्जन मिरवणूक नाही. त्यामुळे तुकाराम माळी तालमीच्या दारातच आरती करून विसर्जन करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह नगरसेवक आणि तालमीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER