
मुंबई :- बांधकाम क्षेत्रात मागणी वाढविण्याच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचे चांगभले आणि राज्याचे हजारो कोटींचे नुकसान करणारा निर्णय तत्काळ स्थगित करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारच्या बांधकाम क्षेत्रासंबंधीच्या धोरणासंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे.
कोरोना (Corona) काळात आजारी पडलेल्या गृह बांधणी क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य सरकारने दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीकडून शिफारशी मागवण्यात आल्या होत्या. “या समितीने केलेल्या शिफारशींचा प्रत्यक्ष काय परिणाम होईल, हे विचारात न घेता निवडक पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जात आहे.” असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.
पत्र ठरावीक उद्देशाने इंग्रजीत लिहितो आहे. कल्पना दिल्यानंतरही तुम्ही सुधारणात्मक निर्णय घेतले नाही, तर नाइलाजाने मी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करेन, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात दिला आहे. तुम्ही कधीही या संदर्भात माझ्याकडून माहिती मागवू शकता, असे फडणवीस यांनी सुचवले आहे.
मूठभर खाजगी लोकांचा फायदा करणारा आणि राज्याचे हजारो कोटींचे नुकसान करणारा निर्णय तत्काळ स्थगित करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
बांधकाम क्षेत्रात मागणी वाढविण्याच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचे चांगभले आणि राज्याचे हजारो कोटींचे नुकसान करणारा निर्णय तत्काळ स्थगित करा.
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र…@OfficeofUT pic.twitter.com/jlW03MpKHu— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 27, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला