… लगेच शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा होतात – नवाब मलिक यांचा मोदींना टोमणा

Nawab Mailk & PM Narendra Modi

मुंबई : निवडणुका आल्या किंवा भाजपा अडचणीत आली की शेतकर्‍यांच्या खात्यात लगेच पैसे जमा होतात, असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी शेतकरी सन्मान निधी खात्यात प्रत्येकी सहा हजार रुपये पाठवणार आहेत. त्यावर नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला केला. म्हणालेत, शेतकरी सन्मान निधीमार्फत पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना पैसे देणार आहेत. निवडणुका आल्यावर पैसे वाटण्याचे काम भाजपाने आधीही केले आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या या कार्यक्रमात त्यांचे कार्यकर्तेच चर्चेला बसून खोटा प्रचार करतील अशी शंका आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

ते म्हणालेत, सहा हजार रुपये शेतकर्‍यांना देता आणि पैसे परत करण्यासाठी नोटीसाही पाठवता! हे नक्की काय चालले आहे? केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांना देशातील शेतकर्‍यांचा विरोध आहे. इतक्या दिवसांनंतर याबाबत देशातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा नवा उपक्रम भाजपाने सुरू केला आहे. पण विश्वासघाताचे राजकारण करणार्‍या भाजपाने आधी स्वत:ची विश्वासार्हता सिद्ध करावी. नवीन कायदा हा शेतमालाची लूट करणारा आहे. भाजपा शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER