अमरावती, यवतमाळ, अकोल्यात तातडीने कंटेन्मेंट झोन जाहीर करा; मुख्य सचिवांचे निर्देश

Containment Zone

मुंबई :- राज्यातील अमरावती (Amravati), यवतमाळ (Yavatmal), अकोला (Akola) या जिल्ह्यांमध्ये कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे, तेथे कंटेन्मेंट झोन जाहीर करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ही बातमी पण वाचा : मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी नवे नियम, नियम न पाळणाऱ्यांवर गुन्‍हा दाखल होणार

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज दुपारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णय तसेच उपाययोजनांबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी पत्राद्वारे कळविले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER