निवडणुका असणाऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला – मनसे

Bala Nandgaonkar

मुंबई :- राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . एका बाजूला हे सर्व सुरू असताना दुसऱ्या बाजूला वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी मनसेने (MNS) काही उपाय सुचविले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निवडणुका असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला, अशी मागणी मनसेने केली आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन; विजय वडेट्टीवारांचे संकेत

मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी याबाबत ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकतात. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button