ना. सतेज पाटील यांच्या ‘खिळेमुक्त झाडांच कोल्हापूर’ मोहिमेला उस्त्फुर्त प्रतिसाद

Satej Patil

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील (Satej patil) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “खिळेमुक्त झाडांच कोल्हापूर” या मोहिमेला आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उत्सहात सुरवात झाली. यामध्ये कोल्हापुरातील ५० स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या. या स्वयंसेवी संस्थांबरोबरच पाचशेहुन अधिक वृक्ष प्रेमी कोल्हापूरकरांनी वैयक्तिकपणे ठिकठिकाणी या मोहिमेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.

शहरातील ठिकठीकाणी जावून झाडावरील खिळे, फलक, तारा, अँगल काढून काढूनझाडांना नवसंजीवनी दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. ही मोहीम राज्यभर राबविण्यात यावी असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.

मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, कायद्यानुसार झाडांना इजा पोहचविणे, त्याच्यावर खिळे मारणे अशा प्रकारचे कृत्य गुन्हा ठरत असल्याने, यापुढे झाडावर खिळे मारणे अथवा बोर्ड लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या संदर्भातील सूचना कोल्हापूर महानगरपालिकेला दिले आहेत. पर्यावरणाची होत असलेली हानी आणि येणाऱ्या काळात वृक्ष संपदेची गरज लक्षात घेता, केवळ कोल्हापुरापूर्ती ही मोहीम मर्यादित न राहता राज्यभर अशा प्रकारची मोहीम लोकांनी हाती घेण्याच आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER