पवारांच्या सूचनेची तात्काळ दखल, पक्षातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

Maharashtra Today

मुंबई : गेल्यावर्षीच्या तुलनेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत कमालीची वाढ झाली आहे. राज्यात नव्हे तर देशातही इतकी गंभीर आणि भयावह परिस्थिती कधीच नव्हती. हे वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाही. लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला कोरोनाच्या संकटाचा सामूहिकरित्या सामना करावा लागेल. महाराष्ट्राचे सामूहिक प्रयत्न आणि केंद्राची मदत या दोहोंच्या साहाय्याने आपण या संकटातून बाहेर पडू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केले होते. त्यांच्या या आवाहनाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ दखल घेतली आहे.

सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. पवारांनी केलेल्या सूचनेनुसार, मुंबईत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या रक्तदान शिबिरात अनेकांनी सहभाग नोंदवला. तसेच राज्यभरात अशाप्रकारचे शिबीर घेण्याचेही ठरवण्यात आले. महाराष्ट्रातील रक्तसाठ्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. कठीण प्रसंगी महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या मी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो, असे म्हणत जयंत पाटील यांनी ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे सूचित केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button