ठाण्यातही मुंबईसारख्या कोविड रुग्णालयांच्या मोठ्या सुविधा तातडीने उभारा – मुख्यमंत्री

मुंबई :- ठाण्यात कोरोनाचे रुग्ण गुणाकाराच्या संख्येने वाढत आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिता व्यक्त केली आहे तसेच, मुंबईप्रमाणे ठाण्यातही कोविड रुग्णालयांसाठीच्या सुविधा ताडीने उभारा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत.

कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईमध्ये ज्या रीतीने सुसज्ज सुविधा निर्माण झाल्या आहेत तशा त्या महानगर क्षेत्रातही होणे अपेक्षित होते आणि वारंवार तशा सूचना देण्यात आल्या होत्या, पण पाहिजे तेवढ्या सुविधा उभारलेल्या दिसत नाहीत. येणाऱ्या काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने अजूनही या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारणे सुरु करा. असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहे. ते म्हणाले या सुविधा उभारण्य़ासाठी मोठे उद्योग, कंपन्या, संस्था यांचीदेखील मदत घ्या. मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ड्रेनेज, शौचालय, पिण्याचे पाणी या सोयी आहेत. आयसीयू, डायलेसिस सुविधा आहेत. पालिकांनी आवश्यक त्या औषधांचा पुरेसा साठा करून ठेवणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : परदेशांमधील हिंदुस्थानींची ‘वापसी’ सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकते – शिवसेना

कोरोनाची ही लढाई फक्त सरकारची नाही. वाड्या आणि वस्त्या, कॉलनीजमध्ये नागरिकांच्या कोरोना दक्षता समित्या बनवा. स्वयंसेवी संस्था , युवकांना यात सहभागी करून घ्या. ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक यांना दुसरे काही आजार आहेत का तसेच त्यांची ऑक्सिजन पातळीबरोबर आहे का, परिसरात कुणाला काही आजार आहेत का, स्वच्छता नियमित केली जाते का, लोक मास्क घालतात का, या तसेच इतर अनेक बाबतीत या नागरिकांच्या समित्याची आपणास मदत होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाशी लढाई एकांगी नको, पालिकांनी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करुन घ्यावे. आपापल्या शहरांतील नागरिकांना, स्वयंसेवी संस्थाना यात सहभागी करुन घ्या जेणे करुन या साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. त्यांनी आज ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हीसीद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला आणि महत्वाच्या सूचना केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER