प्रतिमा डागाळली : मीडिया हाऊसेस विरोधात ३८ जण गेले न्यायालयात

- शाहरुख, आमिर आणि सलमानचाही समावेश

Actors

मुंबई : चित्रपटसृष्टीबाबत बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

गेल्या दोन महिन्यात बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचे काम या सगळ्यांनी केल्याची तक्रार याचिकेत करण्यात आली आहे. बॉलीवूड संबंधित लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करुन मीडिया ट्रायल्स थांबवाव्यात अशी विनंती त्यात करण्यात आली आहे. ज्या लोकांविरोधात तक्रार करण्यात आली आहे त्यांना केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियम, 1994 हा कायदा लागू होतो. त्यांनी जो बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला आहे तो काढून टाकावा शी विनंती करण्यात आली आहे.

बॉलीवूड गलिच्छ आहे, तेथे घोटाळे होतात. ते नशा करतात.बॉलीवूडमधली घाण साफ करण्याची गरज आहे. अरेबियातली सगळी अत्तर ओतली तरी बॉलीवूडमधली घाण आणि दुर्गंधी साफ होणार नाही. भारतातली ही सर्वांत घाणेरडी इंडस्ट्री आहे. कोकेन आणि एलएसडीमध्ये बॉलीवूड बुडाले आहे. या शब्दात माध्यमांनी चित्रपटसृष्टीवर टीका केली, असा आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER