IMA हा अ‍ॅलोपॅथीचा ठेकेदार नाही; त्यांना गांभिर्याने घेऊ नये : रामदेव बाबा

Babaramdev

नवी दिल्ली :- अ‍ॅलोपॅथीवर टीका केल्याबद्दल योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) चांगलेच चर्चेत आले आहेत. या प्रकरणात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (IMA) आक्रमक पवित्रा घेतली आहे. त्यानंतर बाबा रामदेवांवर कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांनी टीव्ही ९ भारतवर्षला मुलाखत दिली.

“अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आभारदेखील मानले आहेत. अ‍ॅलोपॅथीमधील डॉक्टरांचा सन्मान करतो. मग आयुर्वेदाचा अपमान का केला जातो? असा सवाल बाब रामदेव यांनी दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ऑक्सिजन मिळाल्यानंतरही अ‍ॅलोपॅथीची औषधे खाणाऱ्यांनी जीव गमावले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अ‍ॅलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा सन्मान करतो. पण, गुगल केले तर आयुर्वेदाला स्टूपिड सायन्स म्हटले जाते. कोणी सनातन धर्म आणि योगावर अपमानास्पद टिप्पणी करत असेल तर मी गप्प बसणार नाही, असा इशाराही अ‍ॅलोपॅथी रामदेव बाबा यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, “IMA हा अ‍ॅलोपॅथीचा ठेकेदार नाही. ही एक NGO आहे जी इंग्रजांच्या काळात बनली. त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही. अ‍ॅलोपॅथीची निर्मिती करणारे महर्षी सुश्रुत होते. आयुर्वेद आणि योगाने अनेक गंभीर आजार बरे केले आहेत. लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. कोणीही ही बाब नाकारू शकत नाही. प्रश्न उपस्थित करणारे लोक आपल्यावर जळतात. त्यांना भीती आहे की एक गरीब घरातला मुलगा अनेक मोठ्या कंपना बंद पाडेल.” आम्ही अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करत नाही पण एखाद्या डॉक्टरपेक्षा अधिक जाणतो, असा दावाही बाबा रामदेव यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button