अ‌ॅलोपॅथिक सायन्सबाबतच्या रामदेवबाबांच्या अवमानजनक वक्त्यव्याचा आएमएने केला निषेध

Ramdev Baba

नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा (Yoga Guru Ramdev Baba) यांनी अ‌ॅलोपॅथिक सायन्स (Allopathic Science) आणि डॉक्टरांबाबत केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) निषेध केला आहे. आएमएने पत्रक कडून म्हटले आहे की, अ‌ॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा राम कृष्ण यादव उर्फ स्वयंघोषित रामदेवबाबा यांनी वापरली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.

हे वक्तव्य करून रामदेवबाबा यांनी, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्राणांचे बलिदान देणाऱ्या १२०० पेक्षा जास्त डॉक्टरांचा अपमान केला आहे. कोरोनाच्या साथीच्या संकटाला देश तोंड देत असताना रामदेवबाबा यांनी वापरलेल्या अवमानजनक आणि असंस्कृत भाषेमुळे डॉक्टर वर्गाच्या कामामध्ये नकारात्मकता येऊ शकते, असेही निवेदनात म्हटले आहे.

सध्या रामदेवबाबा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामध्ये रामदेवबाबा यांनी अ‌ॅलोपॅथिक सायन्स विषयी अवमानजनक भाषा वापरली आहे. ‘अ‌ॅलोपॅथी हा प्रकार म्हणजे मुर्खपणा आहे आणि तो दिवाळे काढणारा आहे’ असे रामदेवबाबा म्हणाले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी अ‌ॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही भाष्य केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button