“आय ॲम ओके !यू आर ओके ! “(भाग 2)

ego states

हाय फ्रेंड्स ! कालच्या लेखामध्ये आपण आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वात कमी-अधिक प्रमाणात असलेल्या तीन कप्प्यांची ,फाइल्सची ओळख करून घेतली .तुम्ही त्या आपापल्या व्यक्तिमत्वाला लावून बघण्याचा प्रयत्नही नक्कीच केला असेल ! (यांचा सारांश सोबतच्या आकृती वरून लक्षात येईल)

या सर्व फाईल्स व्यक्तिमत्व घडणीत महत्त्वाच्या कशा ? किंवा या फाइल्स कोणत्या परिस्थितीत बंद करून घेतल्या जातात ? हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे!

व्यक्ती वयाच्या अठराव्या वर्षी ॲडल्ट होते. मात्र प्रत्येकाची ही ॲडल्ट फाईल मात्र ओपन होते ते वयाच्या दहाव्या महिन्यापासूनच ! हो ! यावेळी मुलांना रांगता येते .कधीकधी ती एखाद-दोन पावलेही टाकायला लागतात. बघा ह! आता मूल स्वावलंबी झालेलं आहे. चेंडू जरा दूर पडला आहे. मग तो न आणता मुल जवळच खेळण उचलत. कुणी त्याला” चल ! भूर् जाऊ!” म्हंटले तर ते एकदम झेप घेते का? नाही! ते आधी पायात चपला बूट आहेत का ,याचे निरीक्षण करते .आणि मग त्या व्यक्तीकडे जाते. म्हणजे त्याला स्वतंत्र विचार आणि निर्णय क्षमता आलेली आहे.

या वयात त्याच्याकडे P फाईल चे कायदे नियम आहेत आणि C फाइल मधली भीती यांच्या कच्या नोंदी आहेत. उदा. डॉक्टर “टूच” देतात ही सी फाईल मधली भीती असेल. जेव्हा डॉक्टरांच्या औषधाने त्याला बरे वाटते किंवा डॉक्टर कधीतरी चॉकलेट देतात ,तेव्हा तो अनुभव एडल्ट A फाईल मध्ये एडिटिंग प्रक्रिया होऊन बदलल्या जातो.

“वेडेपणा करायचा नाही, नाहीतर पोलिसांकडे देईल!”ही P फाईल मधली सूचना! पण कधीतरी काका बरोबर त्याच्या एखाद्या पोलीस मित्राकडे जाऊन तो चहा पिऊन येतो तेव्हा ती जागा बदलून सूचना A(ॲडल्ट फाईल) मध्ये जाऊन बसते.

म्हणूनच पी फाईल मधले सूचना कायदे असे असावेत, जे त्याला अनुभवावरून खरे असल्याचे समजेल. जर या फाईल मधील मधल्या नोंदी एडिट करताना सारख्या बदलाव्या लागत नाहीत असे जर त्यांना पटले तर ,पेरेंट्स बद्दलची विश्वसनीयता वाढते .मोठेपणी ती मुले शब्दाबाहेर जात नाही. (मुले ऐकत नाहीत ही तक्रार दूर होते) इतके या सूचनांना महत्त्व आहे. एकूणच यामुळे जगण्याच्या गणितातला ताळा जमल्या सारखा वाटतो.

आपण जेव्हा बोलतो किंवा एखादी कृती करतो तेव्हा आपल्याला तसं करण्याची सूचना मेंदूकडून मिळते. आपली विचारशक्ती त्यावेळी मेंदूच्या ज्या टप्प्यामध्ये कार्यरत असेल या कप्प्याच्या किंवा फाईलच्या नोंदीप्रमाणे आपण वागतो बोलतो. म्हणूनच एखाद्या व्यक्तीचा चाइल्ड जास्त डॉमिनंट असला तरी ती कधीतरी Adult file सारखी वागते, याउलट नेहमी Adult file मधून प्रतिक्रिया देणारी व्यक्ती ,अचानक कधीकधी चाइल्ड मधून प्रतिक्रिया देते. आपण काल बघितल्याप्रमाणे बरेचदा आपला उत्साह कधी कधी उतू जातो असं पण आपण म्हंटलं होतं ना ?अगदी तसंच!

या फाईल च्या नोंदी योग्य व सुसंगत असतील तर आपले वागणे बोलणे हे नॉर्मल(Normal)असते. नाही तर समजते, की “कुठेतरी काहीतरी चुकते आहे!”

बाल संगोपनातून वा पालक-पाल्य संबंधातून कधी कधी या फाइल्स बंद होत जातात आणि त्याचा परिणाम काय होतो ते आपण बघू या !

  • चाइल्ड फाईल बंद होते : रडणे हा बालसुलभ अधिकार आहे .काही पालकांना ते रडणे का असते हे कळत नाही .ते कदाचित तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही असू शकते .अशावेळी त्यांना हृदयाशी धरावे, लाड करावे असे त्यांना वाटत असते. परंतु काही दुर्दैवी बालकांच्या हा बालसुलभ भावना पालकांकडून हिरावून घेतल्या जातात .”गप्प बैस ! तोंड बंद कर ! काय हा पसारा मांडून ठेवला आहे. कागदाचा नुसता नास !अभ्यास कर ,नाहीतर गुरे राखायला जा!” यामुळे नकळत C (चाइल्ड फाईल )बंद करून घेतली जाते.

याचा परिणाम म्हणून ही मुलं मोठेपणी अति कर्तव्यतत्पर होतात. ही छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेत नाहीत व घेऊही देत नाहीत. पुढील आयुष्यात काही कारणांनी (P–A-/-C ) यातील भिंत काढून टाकली गेली बुद्धी बालपण परत अनुभवू शकते.

  • पॅरेण्ट फाईल बंद होणे : प्रेम ,जवळ घेणे ,कौतुक या गोष्टी काही मुलांच्या बाबतीत कोसो दूरच राहतात. परंतु अत्यंत अमानुष ,क्रूर ,वागणूक प्रचंड मार, लाथा बुक्क्या काही जणांच्या वाट्याला येतात .अशांच्या बाबतीत कुठले निती संस्कार नी कुठले कायदे ! अशा व्यक्ती आपली P ( पॅरेण्ट फाईल) नकळत बंद करून टाकतात.

याचा परिणाम म्हणून कोणत्याच गोष्टीची चाड नसललेल्या या व्यक्तींना ,कुठलेच अमानुष कृत्य करताना चूक वाटत नाही. त्यांच्यात सुधारणा कठीण असते .फक्त सी फाईल मुळे पकडले जाण्याची भीती असते. पुढे स्वतःची A (एडल्ट फाईल) व अनुभव ,यातून त्या स्वतःची P (पॅरेण्ट फाईल) निर्माण करू शकतात.

यासंबंधीचे उत्तम उदाहरण म्हणजे “दो आखे बारा हाथ” या सिनेमातील सहापैकी कैदी. ते अतिशय अट्टल गुन्हेगार असतात .व्ही शांताराम जेलर दाखवलेत .त्यांच्या नजरेचा धाक पण तो बरेचदा प्रेमळ आणि आदर युक्त सुद्धा असतो, तो ह्या कैद्यांचे परिवर्तन करतो. असा कोणी पुढील आयुष्यात पॅरेण्टरूपात भेटला, तर पुन्हा P (पॅरेण्ट फाईल) तयार होऊ शकते . उदा.( P /- A– C .)

  • एडल्ट फाईल बंद होणे : विचारशक्ती नष्ट झालेल्या व्यक्तींना वस्तुस्थितीची जाणीव नसते. अशांची जन्मतः मेंदूची वाढ झालेली नसते . किंवा अपघाताने मेंदूवर परिणाम झालेला असतो .P (पेरेंट्स) मधील नोंदी , आणि C चाइल्ड फाईल मधल्या भावना, यांच्यातून होणारे विचारांच्या गोंधळाचे मिश्रण ,त्यांच्यात दिसते. अशांना मानसोपचाराची गरज असते.( P-/-A-/-C .)

“I am not ok !You are ok !” कडून “I am ok! You are ok! कडे !”

“ट्रांजेक्शनल अनालिसिस “चा विचार करताना Strocks विचारात घ्यायला हवेत. काय आहे हे प्रकरण? फार कठीण काही नाही .तर आपण परस्परांना जे” ऍप्रिसिएशन “देतो.”शाब्बास! नमस्कार! हाय ! राम राम !अभिनंदन! किंवा व्वा! स्वयंपाक छान झाला आहे ह ! किंवा कधीतरी नुसते एक स्माईल किंवा हात हलवणे !

पण हे खूप महत्त्वाचे आहे . प्रत्येकासाठी ! मुले लहान असताना विशेषतः त्यांची धारणा असते की “आय एम नॉट ओके! यु आर ओके !”(का ते आपण मागच्या लेखा मधून बघितले).परंतु मुलांना वरील प्रमाणे स्ट्रोक्स ,प्रोत्साहन दिले ,प्रत्येक चौकस प्रश्नाला योग्य उत्तर दिले ,तर ती मुले निर्णय क्षमता असणारी आणि विचारी घडतात. आणि मग “आय एम ओके !यु आर ओके!” हा बदल त्यांच्यात होतो.

नाहीतर काही लोक या या “स्ट्रोक्स” चे भुकेले राहतात .असे लोक अनुकूल परिस्थिती असूनही फक्त “नोट ओके “च्या धारणेमुळे मागे राहतात .असे लोक साधारणतः सभेमध्ये श्रोता म्हणून कधीही पुढच्या ओळीतील खुर्च्यांवर बसणार नाहीत . हुशार ज्योतिषी मात्र याचा फायदा घेऊन पाच पन्नास रुपये घेऊन जातात आणि सांगतात,”तुमच्यात सगळं काही आहे साहेब. पण तुमच्या श्रमाचे चीज होत नाही बघा!”

आता आपण या माहितीतल्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत.

यासंबंधीच्या चार धारणा कोणत्या ?

आणि दोन व्यक्तींमधील सुसंवादांमध्ये या फाइल्सची काय भूमिका असते ? की जिच्यामुळे “संवाद — सुसंवाद — सुख संवादाच्या ” ट्रॅकवर गाडी सुसाट धावते , ते बघूया उद्याच्या भागात!

मानसी फडके
एम ए मानसशास्त्र,
एम. एस. समुपदेशन आणि सायको थेरपी
एम .ए. मराठी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER