सुपरमॅन डीविलियर्स म्हणतो, मीसुध्दा इतर फलंदाजांसारखा नर्व्हस असतो

AB De Villiers

सुपरमॅन (Superman) एबीडी विलियर्स (AB devilliers) अतिशय वेगाने धावा जमवत असला, गोलंदाजांच्या छातीत धडकी भरवत असला तरी त्याने आपणसुध्दा इतर फलंदाजांप्रमाणेच पाठलाग करताना तणावात असतो, चिंतीत असतो असे त्याने म्हटले आहे. त्याने आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये 57 ची सरासरी व 190 च्या स्ट्राईक रेटने 285 धावा केलेल्या आहेत. शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुध्द (Rajsthan Royals) 22 चेंडूतच 55 धावांची खेळी त्याने केली. त्यामुळे बंगलोरने (RCB) 28 चेंडूत 64 धावांचे लक्ष्य गाठत सामना जिंकला.

डीविलियर्स फलंदाजी अगदी सहज करतो. तो कधी तणावात आहे असे दिसत नसले तरी आपणही पाठलाग करताना नर्व्हस असतो. बेचैन असतो, डोक्यात विचित्र गोष्टी सुरु असतात पण मी त्या लपवण्याचा प्रयत्न करतो असे त्याने म्हटले आहे.

टी-20 चा बादशहा मानल्या जाणाऱ्या युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या अगदी ऊलट हे विधान आहे. ख्रिस गेलने दोन दिवसांपूर्वीच आपण …आणि नर्व्हस…कधी नाही! असे म्हटले होते.

रविवारी आरसीबीला 12 चेंडूत 35 धावा हव्या असताना त्याने जयदेव उनाडकटला लागोपाठ तीन षटकार लगावून सामन्याला कलाटणी दीली आणि जोफ्रा आर्चरला षटकार लगावून सामना संपवला सोबतच आपले अर्धशतकही साजरे केले.

आपल्या कामगिरीबद्दल तो म्हणतो की निश्चितच अभिमान वाटावा अशी कामगिरी आहे. संघाच्या विजयात योगदान द्यावे, तसा प्रभावी खेळ करावा असा प्रयत्न असतोच. मालकांना मला दाखवायचे आहे की मी चांगल्या कामासाठी येथे आलोय. त्यांचा विश्वास माझ्यावर रहावा आणि मी त्याची परतफेड करावी. माझे कुटूंब, माझे चाहते आणि मला स्वतः ला आनंद मिळावा असा प्रयत्न असतो असे त्याने म्हटले आहे.

त्याचा कर्णधार विराट कोहली आपल्या सुपरमॅनची प्रशंसा करताना थकत नाही. कोहली म्हणतो की, एबी हा नेहमीच संघाचा विचार करतो आणि तसा आपला खेळ करतो. हे पुन्हा पुन्हा दिसुन आले आहे. माझ्या मते आयपीएलमध्ये सामन्याच्या निकालावर सार्वाधिक प्रभाव टाकणारा तो खेळाडू आहे.

आणि एबीडीचा प्रभाव बघण्यासारखा आहे. त्याने आयपीएलमध्ये 25 चेंडूपेक्षा कमी चेंडूत सर्वाधिक अर्धशतके करण्याच्या डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाची बरौबरी केलेली होती. दोघांचीही अशी प्रत्येकी 8 तुफानी अर्धशतकं आहेत. यात विशेष हे की एबीडीने 21, 22, 23 आणि 24 चेंडूतच अर्धशतके झळकावली आहेत. त्यापैकी 23 चेंडुतच त्याने तब्बल पाच वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यंदाच्या आयपीएलमध्येच त्याने चार,अर्धशतकं 29 पेक्षा कमी चेंडूत झळकावले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER