मी लवकरच येतेय

Sai Tamhankar

स्टनींग मेकअप ,लाल रंगाचा स्टायलिश ड्रेस आणि त्या फोटो खाली “मी लवकरच येतेय” अशी उत्सुकता वाढवणारी कॅप्शन. अभिनेत्री सई ताम्हणकर हीच्या सोशल मीडिया पेजवर सध्या याच फोटोची चर्चा सुरू आहे . ती कुठल्या सिनेमातून किंवा कुठल्या मालिकेतून किंवा कुठल्या नाटकातून प्रेक्षकांसमोर येणार हे जरी गुलदस्त्यात ठेवले असलं तरी लवकरच सई आपल्याला अभिनय करताना पाहायला मिळणार आहे हे ऐकून तिच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सई ताम्हणकर (Sai Tamhankar) रियालिटी शोच्या परिक्षक खुर्चीवर बसून दिलखुलासपणे हसताना दिसत आहे. वजनदार या सिनेमानंतर तिला मोठ्या पडद्यावर कधी पाहतो असे तिच्या चाहत्यांना झाले आहे. हीच प्रतिक्षा सईने संपवली आणि आपल्या आणि आपल्या इन्स्टा पेज वर पोस्ट केलेल्या फोटोत, ” मी लवकरच येतेय” अशी ओळही लिहिली आहे. मराठी मधील एक बोल्ड अभिनेत्री अशी ओळख असली तरी सईने आजपर्यंत अनेक गंभीर भूमिका देखील ताकदीने केल्या आहेत. त्यामुळे तीचा फॅन फॉलोअर्स खूप मोठा आहे. मध्यंतरी थोडीशी वजनदार झालेली सई आता स्लिम ट्रीम झाली आहे आणि त्यामुळे तिचे स्टाइल स्टेटमेंटचे फोटो देखील लक्ष वेधून घेत आहेत.

दोन दिवसांपूर्वी तिने तिच्या इन्स्टापेज वर शेअर केलेला लाल रंगाच्या लॉन्ग ड्रेस मधला फोटो खूपच व्हायरल झाला आहे. फोटो वरची नजर हलते हलते तोच तिने त्या फोटोसोबत मी लवकरच तुम्हाला अभिनय करताना दिसेन अशा आशयाची कॅप्शन देखील दिल्याने तिच्या सरप्राईज पोस्टवर कमेंटचा पाऊसही पडला आहे.

सांगलीची मुलगी अशी ओळख असलेल्या सईने मालिकेतही काम केले होते. 2018 आलेल्या ब्लॅक अँड व्हाईट या सिनेमातून जरी तिने मोठ्या पडद्यावरील अभिनयाला सुरुवात केली असली तरी तिने तिच्या अभिनयाने तिची कारकीर्द उजळून टाकली आहे. तिचा अभिनय गजनी या हिंदी सिनेमात देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. दुनियादारीतील शिरीन या भूमिकेने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवले तर त्यानंतर प्यार वाली लव स्टोरी, पोर बाजार, झपाटलेला 2, या सिनेमातून तिचा रोमँटिक अंदाज देखील पाहायला मिळाला.

अमेय गोसावी याच्यासोबत सोबत तिचा विवाह झाला होता मात्र तो दोन वर्षापेक्षा जास्त काळ टिकला नाही. मात्र आयुष्यातील काही वैयक्तिक समस्यांमधून बाहेर पडत पुन्हा एकदा सईने अभिनय आणि वेगवेगळे शो तसेच डान्स याकडे आपले लक्ष केंद्रित केले. सईच्या भूमिका दिसतात तशा तिच्या स्टाईल आणि फॅशन फॉलो करणाऱ्या मुली देखील तिला सतत सोशल मीडियावर पहात असतात. ती आता नव्याने कुठली भूमिका घेऊन येणार ही उत्सुकता अजून तरी थोडे दिवस अशीच राहणार आहे. सई पुन्हा मालिकेत दिसणार कि सिनेमात ही तिच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER