औरंगाबाद : देशी दारूची अवैध वाहतूक करणारे ताब्यात

Illegal traffickers of liquor arrested in Aurangabad

औरंगाबाद : देशी दारूची अवैध वाहतूक करणा-या दोघांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून १ लाख ७८ हजारांची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील नेवरगाव ते वाहेगाव रोडवरील मनसे चौकात करण्यात आली.

अहमदनगरहून गंगापूर मार्गे नेवरगावातून कारमध्ये (एमएच-२०-डीव्ही-५५७८) देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. या माहिती आधारे पोलिसांनी सापळा रचत कार थांबविली. यावेळी ट्रॅव्हल्स आठ बॅगमध्ये १ हजार १८८ देशी दारूच्या बाटल्यांची वाहतूक करताना विनोद प्रेमचंद मोहतले (३२, रा. पीरबाजार, उस्मानपुरा) आणि अजय रमेश वाहुळ (२५, रा. साईनगर, सातारा परिसर) यांना पकडण्यात आले.

त्यांच्याजवळील दारू आणि कार जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक साळुंके, जमादार नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, रामेश्वर धापसे, वाल्मीक निकम यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER