गोवा मार्गे येणारा अवैध मद्यसाठा जप्त

कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शासनाचा महसूल चुकवून गोवा मार्गाने येणारा मोठा मद्यसाठा पकडण्याची कारवाई केली आहे.  चंदगड तालुक्यातील आमरोळी गावात ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये देशी, विदेशी मद्याचे ४६ बॉक्स, सुमो, दुचाकी असा ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याचा दुसरा साथीदार फरार आहे. राज्याचे महसूल चुकवून गोवा व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात देशी आणि विदेशी मद्य येत असते. त्यामुळे हे रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारीपथके नेमली आहेत. याच पथकाने ही कारवाई केली आहे.