जसे आम्ही १०५ आमदारांवर भारी; तसे चार खासदार ३०३ वर भारी; राष्ट्रवादीचे पडळकरांना उत्तर

Amol Mitkari & Gopichand Padlkar

मुंबई : ‘जसे महाविकास आघाडीचे ५६/५५/४४ आमदार भाजपाच्या १०५ ना भारी पडले, तसे राष्ट्रवादीचे चार खासदार भाजपच्या ३०३ खासदारांना भारी पडतात’ अस टोमणा राष्ट्रवादीचे आ. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपाचे आ. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना मारला.

‘ज्या पक्षाचे ४ खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग ३०३ खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचे ? तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली तर इतका त्रागा का करता?’ असा सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला होता; त्यावरून हा वाद सुरु झाला आहे.

‘इकडे ४ खासदार ३०३ ला भारी. जसे ५६/५५/४४ (१०५) ला भारी. बारामतीत डिपॉझिट का जप्त झाले, यावर भाष्य केले असते, तर समजू शकलो असतो. प्रसिद्धी पिसाटांना थोड चर्चेत राहायला अधून मधून मानसिक झटके येतात. आश्रममधील जपनामवाला भुपा आणि साहेबांवर टीका करणारा (भा)जपनामवाला गोपा सारखेच’ असे मिटकरी म्हणाले.

‘ज्यांच्या डोक्याच्या गोळ्या संपल्यात अशा वाचाळवीरांनी औकात पाहून साहेबांवर बोलाव. राहिला मोदींचा प्रश्न तर त्यांना विचार तुमचा गुरु व मार्गदर्शक कोण?’ असा टोमणा मिटकरींनी मारला.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर भाजपाच्या तिकीटावर बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मैदानात उतरले होते. अजित पवारांनी विक्रमी मताधिक्याने निवडून येत पडळकरांच डिपॉझिट जप्त केले, याचा संदर्भ मिटकरींनी जोडला आहे.

‘आश्रम’ या बहुचर्चित वेब सीरिजमधील अभिनेता बॉबी देवलने साकारलेल्या ‘भुपास्वामी’ या व्यक्तिरेखेचा उल्लेखही मिटकरींनी पडळकरांवर टीकास्त्र सोडताना केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER