आयआयटीच्या पोरांनी शेतीत घातलं लक्ष, घेतायेत आता वर्षाला करोडोचं उत्पन्न !

IIT kids pay attention to agriculture, now they are earning crores a year!

पश्चिम महाराष्ट्राला साखर पट्टा म्हणलं जातं. कारण इथं उसाचं आणि पर्यायानं साखरेचं उत्पन्न सर्वाधिक होतं. पण आयआयटी बॉम्बेच्या दोन विद्यार्थ्यांनी पश्चिम महाराष्ट्राला नवी ओळख निर्माण करुन दिलीये.

पश्चिम महाराष्ट्रतलं कोल्हापूर गुळ, साखर, कोल्हापूरी चप्पल आणि पर्यटनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. पण या दिवसात इथं जैविक शेती करुन भाज्यांचं उत्पन्न घेतलं जातंय. दोन इंजिनिअर्सनी ही शेती सुरु केलीये.

कोल्हापूरात ५० एकराच्या जमिनीवर त्यांनी एक्वापोनिक आणि हयड्रोपोनिक फार्म उभारलंय. ‘लँडकाफ्ट अॅग्रो’ (Landkaft Agro) नावाची कंपनीची सुरुवात करत पारंपारिक शेतीपद्धतीला फाटा देत भरघोस उत्पन्न ही मुलं कमावतआहेत.

मयंक गुप्ता आणि ललित झावर आयआयटी बॉम्बेमध्ये इंजिनिअरींग करताना एकमेकांच्या संपर्कात आले. मयंकने जिलिंगो नावाचं स्टार्टप सुरु केलं आणि २०१२ ते २०१८च्या दरम्यान त्याने आशियाचा दौरा केला. तर ललितने २०११ला कुटुंबाच्या कपड्याच्या आणि रिअल इस्टेटच्या व्यवसायाशी स्वतःला जोडून घेतलं.

सुरुवात

२०१८ला मयंकने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नवीन काय केलं जावू शकतं या विचारात तो होता. याच दरम्यान त्याने ललित सोबत जैविक भाज्यांच्या विक्रीसाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म उभारण्याचा निर्णय घेतला. यानंतर केलेल्या रिसर्चनंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा हा व्यवसाय फार काळ टिकू शकणार नाही. जैविक खतांवर पिकवलेला, रसायनमुक्त, ताजा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी नवा मार्ग बनवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांना प्रत्यक्षात अत्यल्प असे शेतकरी भेटले जे जैविक पद्धतीनं भाजीपाला पिकवत होते. बाजारातली ही त्रुटी ध्यानात घेवून स्वतःच जैविक खतांवर रसायनमुक्त भाजीपाला पिकवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या शेतीचा स्टार्टप कोल्हापूरातूनच चालू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

कोल्हापूरच्या मातीची गुणवत्ता चांगलीये. पाणी देखील या भागात मुबलक आहे. भौगोलिक स्थितीचा विचार करता पुणे, मुबंई आणि गोवा, बेंगलोर या शहरात भाजीपाला पाठवणं या भागातून सहजशक्य आहे. या सर्व बाबी ध्यानात घेवून कोल्हापूरापासून ३० किमीच्या अंतरावर असणाऱ्या इचलकरंजीत ‘लँडक्राफ्ट अॅग्रो’ नावाची कंपनी उभारली.

ग्राहकांचे विचार बदलले

लँडकाफ्ट अॅग्रो ४० एकरात हायड्रोपोनिक आणि ३ एकरात ४० प्रकारच्या भाज्या पिकवते. ललित आणि मयंकने वाढत्या मागणीसाठी १०० शेतकऱ्यांच्या १५० एकर कृषीक्षेत्रावर पॉलीहाऊस लावण्यासाठीचे प्रशिक्षण देताहेत. आता या भाज्या महाराष्ट्रासह हैद्राबाद, चैन्नई आणि दिल्लीतही विकल्या जाताहेत. एका वर्षामागं सुरु केलेला हा स्टार्टप प्रतिमहिना ८० लाखांची उलाढाल करतोय. कमाईचे आकडे मोठे दिसत असले तरी बाजारात जागा बनवण्यासाठी तितकीच प्रचंड मेहनत घ्यावी लागली असं ही ते सांगतात.

शेतीचा अनूभव दोघांनाही नव्हता. त्यांनी एक रोपटंही आयुष्यात उगवलं नव्हतं. सुरुवातीच्या काळात मयंक आणि ललितकडून चुकाही झाल्या पण त्यातून ते वेळेत सावरले. खुप साऱ्या रिसर्चनंतर, तंत्रज्ञानविषयक सल्ले घेतल्यामुळं त्यांना व्यवसायात यश मिळालं. जैविक भाज्याचे उत्पन्न मिळवल्यानंतर त्या वेळेत बाजारापर्यंत ग्राहकांपर्यंत पोहचवणं आवश्यक होतं, जैविक भाज्यांच्या वापराबद्दल शेतकरी आणि ग्राहक दोघांचे विचार बदलणे आवश्यक होते. कोरोनामुळं आता हे लोक आरोग्यबाबतीत जागृत झालेत. त्याचा फायदा येत्या काळात शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना होईल अशी आशा ते व्यक्त करत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER