IIT चे हेलिकॉप्टर चीनला देणार दणका

IIT helicopter to hit China

कानपूर :- भारतीय सैन्यात अत्याधुनिक हेलिकॉप्टर (IIT helicopter)  आणि विमाने उपलब्ध आहेत. कानपूरच्या आयआयटीमध्ये अत्याधुनिक हेलिकॉप्टर तयार करण्यात आली आहेत. सैन्यासाठी हेलिकॉप्टरचे खूप महत्त्व आहे. अवघड मोहिमेमध्ये या हेलिकॉप्टरची मोठी मदत होणार आहे. यामुळे डोंगराळ भागात आणि दुर्गम भागात सैनिकांसाठी मदत पोहचवणे सोपे होणार आहे. मेडिकल आणि इतर कारणांसाठीदेखील या हेलिकॉप्टरची मोठी मदत होणार आहे.

आयआयटी कानपूरच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाने वैज्ञानिक प्रोफेसर अभिषेक यांच्या देखरेखीखाली या हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. या हेलिकॉप्टरचे ‘इंड्योर-१५’ (Indoor-15) असे नाव आहे, असे ट्विट करून माहिती दिली आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठा एअर शो असलेल्या एयरो इंडिया २०२१ ची (Aero india) आज बेंगळुरूमध्ये सुरुवात होणार आहे. हे हेलिकॉप्टर आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. यात असलेल्या वैशिष्ट्यांमुळे शोमधील सर्वांचे लक्ष हेलिकॉप्टरकडे असणार आहे. चार किलो वजनाच्या हेलिकॉप्टरमध्ये उंच उडण्याची क्षमतादेखील आहे. यामुळे भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवर सैन्यासाठी हेलिकॉप्टरची खूप मोठी मदत होणार आहे.

दहशतवाद्यांचा बीमोड करण्यास भारतीय सैन्याला मोठी मदत होईल. सध्या हेलिकॉप्टरच्या चाचण्या सुरू आहेत. रेस्क्यूमध्ये फायदेशीर ठरण्यासाठी विशेष कॅमेरे बसवण्यात आले आहेत. १५ किलोमीटर दूरवरून व्हिडीओ डेटा पाठवू शकतो. पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. हे व्हर्टिकल लँडिंग आणि टेकऑफ करू शकणार आहे. उणे २० ते ५० डिग्री सेल्सिअसच्या तापमानातदेखील हे काम करू शकणार आहे. त्यामुळे अतिशय कार्यक्षम असलेले हे हेलिकॉप्टर डोंगराळ भागात खूपच फायदेशीर ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER