आयआयटी मुंबईचे विद्यार्थी म्हणाले, द्वेषाचे राजकारण नको!

मुंबई :- आयआयटी मुंबईची २०२० या वर्षाची सर्वसाधारण निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत विद्यार्थ्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र आयआयटीबाहेरील शक्तींकडून निर्माण करण्यात आले. त्यामुळे आयआयटी प्रशासनाने एक निवेदन जारी केले होते. आता, आयआयटीबाहेरील शक्तींविरोधात विद्यार्थी संघटनांनीही एकत्र येत निवेदन जारी केले आहे. इन्स्टिट्यूट रीसर्च स्कॉलर्स कंपॅनियन प्रोग्राम, इन्स्टिट्यूट स्टुडंटस कंपॅनियन प्रोग्राम, रीसर्च स्कॉलर्स फोरम या संघटनांनी हे निवेदन दिले आहे.

पंचायत समितीचा अधिकार वाढवणार : हसन मुश्रीफ

सोशल मीडियावरील द्वेषाच्या राजकारणाचा निषेध करीत असल्याचे यामध्ये म्हटले आहे. आयआयटी मुंबईच्या निवडणुका राजकारणविरहित असतात. आमच्या परिसराचे ऐक्य कायम आहे. विद्यार्थांची वैयक्तिक राजकीय मते असू शकतात; मात्र, पार पडलेल्या सर्वसाधारण निवडणुकीतील द्वेषाच्या मोहिमेचे समर्थन कदापि करता येणार नाही, असे या संघटनांनी म्हटले आहे.