
कराची : पाकिस्तानात कराची येथे शुक्रवारी झालेल्या भीषण विमान अपघातात विमानाच्या चालकाने हवाई नियंत्रकांनी दिलेल्या तीन सर्तकतेच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे पुरावे मिळाले आहेत. या अपघातात विमान कर्मचाऱ्यांसह ९७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. असे लक्षात आले आहे की, विमान उतरवणे सुरू करण्यापूर्वी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने वैमानिकाला त्याच वेग आणि उंचीकडे लक्ष देण्याची सूचना केली होती. वैमानिकाने विमानाची उंची कमी करण्याऐवजी मी समाधानी आहे, मी आरामात विमान उतरवू शकतो, असे उत्तर दिले होते.
वास्तविक, विमान त्यावेळी १० हजार हजार फूट उंचीवर होते. निकषानुसार ते सात हजार फूट उंचीवर असायला पाहिजे होते. याबाबत नियंत्रण कक्षाने वैमानिकाला सतर्क केले होते. त्यावर त्याने विमान खाली (कमी उंचीवर आणण्याऐवजी) मी आरामात विमान उतरवू शकतो, असे उत्तर दिले होते.
याशिवाय विमान २ तास ३४ मिनिटे उडू शकेल इतके इंधन विमानात होते. त्यामुळे विमान उतरवण्याची घाई करण्याची गरज नव्हती. या कारणाशिवाय विमानात काही यांत्रिक दोष होता काय याचीही चौकशी सुरू आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला