भाजपच्या विरोधाकडे दुर्लक्ष, बांधकाम व्यावसायिकांना सवलत देण्याचा प्रस्ताव अखेर मंजूर

Thane Municipal Corporation

ठाणे : कोरोनाच्या (Corona) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला सुगीचे दिवस यावे यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. तर ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) देखील बांधकाम व्यावसायाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रचलित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक आणि अन्य बाबींवर आकारण्यात येणाऱ्या अधिमुल्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे या प्रस्तावाला भाजपने (BJP) कडाडून विरोध केला होता. मात्र भाजपच्या विरोधाला न जुमानता हा प्रस्ताव मंजूर करवून घेण्यास सत्ताधाऱ्यांना यश मिळाले.

बुधवारी झालेल्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला होता. परंतु या प्रस्तावाला भाजपने विरोध करीत सर्वसामान्य ठाणेकरांना ५०० चौरस फुटांच्या घरांना सवलत देऊ शकत नाही, मात्र दुसरीकडे विकासकांसाठी ग्रीन कारपेट कशासाठी असा प्रश्न उपस्थित करीत भाजपने या प्रस्तावाला विरोध केला होता. परंतु हा विरोध डावलून बुधवारी झालेल्या महासभेत हा प्रस्ताव अखेर मंजुर करण्यात आला आहे.

दरम्यान, मागील वर्षी करोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला होता. त्यानंतर मधल्या काळात र्निबध शिथील करण्यात आले होते. परंतु नियम शिथील करण्यात काहीशी आहे. बांधकाम क्षेत्रला देखील याचा अधिक फटका बसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या क्षेत्रला नवसंजीवनी मिळावी यासाठी राज्य सरकारने धोरण आखले आहे. यामध्ये प्रचलित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक आणि अन्य बाबींवर आकारण्यात येणाऱ्या अधिमुल्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी. चालू आणि नवे प्रकल्प यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत प्रत्यक्ष जमा करण्यात येणाऱ्या अधिमुल्याच्या रक्कमेवर ही सवलत राहणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. अतिरिक्त चटई क्षेत्न निर्देशांकाव्यतिरिक्त जीने, पार्कीग सवलत शुल्क आणि मोकळ्या जागेमधील सवलत शुल्क यासाठी आकरण्यात येणाऱ्या अधिमुल्यामध्येही ५० टक्के सवलत देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button