स्वबळावर सत्तेत येणार असाल तर शुभेच्छा, संजय राऊतांचा काँग्रेसला टोमणा

Sanjay Raut - nana Patole - Maharastra Today

पुणे :- काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल, असे काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले होते. या संदर्भात पत्रपरिषदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात काँग्रेसला टोमणा मारताना शिवसेनेचे (Shivsena) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत – काँग्रेस स्वबळावर केंद्रात सत्तेवर येणार असेल तर आमच्या शुभेच्छाच आहेत!

महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात राऊत म्हणालेत की, स्थानिक पातळीवर आघाडीने एकत्र लढाव असा आमचा प्रयत्न आहे. नाना पटोले स्वबळावर लढणार असतील तर तो त्यांचा निर्णय असेल. मग काँग्रेसने केंद्रातही स्वबळावर निवडून याव, आम्ही पाठिंबा देऊ! असा टोमणा राऊत यांनी मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button