नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं नाव बदला…

CM Uddhav Thackeray

मुंबई :- औरंगाबादच्या (Aurangabad) निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा नामांतरावरून राज्यातील राजकारण पेटले आहे. त्यातच कॉंग्रेसने (Congress) या नामांतरासाठी विरोध असल्याचे म्हटल्यानंतर विरोधकांच्या हाती आयते कोलीतच मिळाले आहे.

त्यातच आता पुन्हा समाजवादी पार्टीनेही (Samajwadi Party) यात उडी घेतली आहे.

शहारांची नावं बदलण्याची मागणी जोर पकडत असतानाच महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानंही स्पष्ट भूमिका मांडत नामांतराला विरोध दर्शवला आहे. सपाचे नेते आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आवाहन केलं आहे. “शहरांची नावं बदलून कुणाचं पोट भरत नाही. शहरांना आवडीचं नाव ठेवायचंच असेल, तर नवी शहरं वसवून ठेवा. अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीनं नामांतर करणं योग्य नाही. नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या. रायगडचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणं हे आपल्याला शोभत नाही,” असं आवाहन अबू आझमी यांनी केलं आहे.

“हे आपल्यासारख्याला शोभत नाही”

“महाराष्ट्रात जगभरातून, देशातून लोक येत असतात. तुम्ही राज्याला पुढं घेऊन जा. विकास करा. नवे जिल्हे निर्माण करा. लोक नक्कीच तुमचं कौतुक करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचं काम करू नका. ते आपल्यासारख्याला शोभत नाही,’ असं आझमी यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनाप्रमुखांनी 30 वर्षांपूर्वीच औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलंय, त्यावर फक्त सही शिक्का उमटायचा – राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER