‘कोरोनाची लस हवी असेल तर आत्मनिर्भर व्हा !’ राहुल गांधींची केंद्रावर खोचक टीका

Rahul Gandhi & PM Modi

नवी दिल्ली : केंद्र आणि ट्विटर यांच्यातील वाद विकोपाला गेला असून, शनिवारी केंद्र सरकारने (Central Government) ट्विटरला नियम पाळण्यासंदर्भात नोटीस बजावली. त्यातच ट्विटरनेही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडून खात्यावर दीर्घ काळापासून लॉगइन केले नसल्याने ‘ब्लू टिक’ हटविली होती, असे स्पष्टीकरण देत वेळ मारून नेली. नंतर दोन तासांत ती पुन्हा बहाल केली. आणि याच मुद्द्यावरून काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडत आहे, कोरोनाची लस हवी असेल तर आत्मनिर्भर व्हा !’ असं खोचक ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच या ट्विटसोबत Priorities हा हॅशटॅगदेखील वापरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button