‘किंबहुना’ वापरले तर चालेल ना? राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या शैलीवर मिस्कील टोला

Raj Thackeray - Uddhav Thackeray

मुंबई :  राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली . यावेळी त्यांनी भाषणाच्या शैलीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे . पत्रकार परिषदेला सुरुवात करताना राज ठाकरे यांनी, ‘मी ‘किंबहुना’ वापरलं तर चालेल ना?’ असा मजेशीर प्रश्न विचारला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांशी संवाद साधला आहे. यावेळी उद्धव ठाकरे आपल्या भाषणात ‘किंबुहना’ शब्दाचा बऱ्याचदा वापर करताना दिसतात. यावरून सोशल मीडियावर बरीच मिम्सही व्हायरल झाली होती. आज पत्रकार परिषदेला सुरुवात करताना राज ठाकरे यांनी ‘किंबहुना’ शब्द उच्चारला. त्यानंतर त्यांनी थोडा वेळ थांबून ‘मी किंबहुना वापरले तर चालेल ना?’ असा प्रश्न विचारला. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या कोरोनासंदर्भातील उपाययोजना सकारात्मक असल्याचे म्हटले.

प्रसारमाध्यमांनी कोरोनासंदर्भातील खरी परिस्थिती दाखवावी. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक तर बाहेरच्या राज्यांमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत. दुसऱ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे देशात फक्त महाराष्ट्रातच कोरोना रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button