…तर पुढचा विचार करू, पडळकरांकडून राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत

Sharad Pawar - Navnath Padalkar

पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीतून माजी आमदार बळीराम सिरस्कर, माजी आमदार हरिभाऊ भदे, नवनाथ पडळकर, अर्जुन सलगर या प्रमुख नेत्यांसह अनेक कार्यकर्ते बाहेर पडले होते. यातील काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यातच दोन दिवसांपूर्वी या नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असे राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आल्या. मात्र याबाबत खुद्द पडळकर यांनी खुलासा केला आहे.

राज्यसभेसाठी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचा नकार; म्हणाले, सोनियाजी दुसऱ्याला संधी द्या!

’आम्ही शरद पवारांची भेट घेतली. आम्ही त्यांच्याकडे बारा मागण्या ठेवल्या आहेत. त्या सर्व सामाजिक आहेत. व्यक्तिगत नाहीत. ओबीसींची जातवार जनगणना व्हावी, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी, भटक्या विमुक्तांना सत्तेत वाटा मिळावा, धनगर समाजाला वीस टक्के वाटा मिळावा, या मागण्या केल्या आहेत. याबाबत आमची चर्चा झालेली आहे. अजून चर्चा होणार आहे. या चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तरच पुढची वाटचाल होईल. असं म्हणत त्यांनी मागण्या मान्य झाल्यास राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत दिले आहे.