प्रामाणिकपणे आरक्षण पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुंख्यमंत्री करणे ही एकच अट – नितेश राणे

Nitesh Rane-Devendra Fadnavis

सिंधुदुर्ग :- देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलंत तर तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असा दावा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.

“इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. हे मार्ग अवलंबल्याने मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेल. मात्र, मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही. खासदार उदयनराजे यांच्याप्रमाणे मीही सांगतो. लवकरात लवकर तुम्ही जर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री बनवलंत तर तीन महिन्यात आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असं नितेश राणे म्हणाले.

यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप केला. तसे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं तर तीन महिन्यांत आम्ही मराठा समजाला टिकेल असं आरक्षण देऊ असा दावा केला. तसेच, हे चोरांचं सरकार आहे. महाविकास आघाडीला मराठा समाजाला त्रास द्यायचा आहे असे म्हणत प्रामाणिकपणे आरक्षण पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुंख्यमंत्री करणे ही एकच अट असल्याचंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER