हे वाचाल तर पुढच्या वेळी दारु पिताना दोनदा विचार कराल!

Alcohol

जागतिकीकरणानंतर भारतात दारू पिण्याला वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली. पार्टीमध्ये दारू घेतलीच पाहिजे वगैरे असा प्रघात सुरु झाला. अनेकदा दारूचा आग्रह करताना, “थोडीशी घे काही होत नाही, नाहीतर वाईन घे, वाईन हृदयासाठी चांगली असते.” असे दाखले दिले जातात.

दारु पिण्याबद्दल कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या जात असल्यातरी लॅटन्सेनं प्रसिद्ध केलेल्या संशोधनानं दारु पिणं आरोग्यासाठी घातकच असल्याच स्पष्ट केलंय. योग्य प्रमाणात दारू पिल्यानं हृदय रोगासपासून संरक्षण मिळणार असलं तरी दारु पिल्यानं होणार नूकसान त्या संरंक्षणापेक्षा कित्येक पट जास्त धोकादायक असल्याच पुढं आलंय.

संशोधनाची व्यापती मोठी आहे

हे मत बनवण्यासाठी २६ वर्ष संशोधन सुरु होतं. १९५ देशातील नागरिकांना या संशोधनात सामील करुन घेण्यात आलं असल्यामुळं संशोधनातून पुढं आलेली तथ्यदेखील वैश्विक आहेत.

भारतात दरवर्षी ३ लाख लोक गमावतात जीव

भारतात दरवर्षी ३ लाखांहून जास्त लोकं दारुमुळं जीव गमवतात असा रिपोर्ट जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. पैकी १ लाख जण आपला जीव रस्ते अपघातात गमावतात. तर दुसऱ्या हाताला ३० हजार मृत्यू हे कॅन्सरनं होतात. ही आकडेवारी गंभीर आहे.

दररोज जगभरात ६ हजार लोक दारूमुळं प्राण गमावतात. त्यामुळं दारु पिण्याच्या सवयीचा पुनर्विचार होणं गरजेच असल्याच जागतिक आरोग्य संघटना म्हणते.

भारतात अशी आली दारू

दारुचा इतिहास मानवाच्या इतिहासाइतका प्राचीन आहे. भारतात हजारोवर्षापूर्वी पासून यज्ञ करताना जो सोमरस प्राशन पित ती सुद्धा एका प्रकारची दारू होती. ज्याला सोमरसही म्हणलं जायचं. काही इतिहासकारांमध्ये सोमरसाला दारु म्हणू नये असाही मतप्रवाह आहे.

ऋग्वेदात (नववे मंडल) सोमवल्लीचा उल्लेख एक देवता म्हणून आला आहे. त्याचे उत्तेजक व मादक परिणाम सांगितलेत. तांदूळ व सातू यांपासून ‘सुरा’ हा दारूप्रकार त्या काळी बनवला जायचा. याशिवाय ‘परिसृत’ (फुलांपासून किंवा गवतापासून बनविलेले), ‘किलाल’ (एकदल धान्यापासून बनविलेले), ‘मासर’ (तांदूळ व मसाल्याचे पदार्थ यांच्या मिश्रणापासून केलेले) या दारूप्रकारांचे वर्णन त्या वेळच्या पुस्तकांमध्ये, महाकाव्यात आणि ग्रंथात आढळते.

कापिश्यायनी व हुरहुरक ही दारू अफगाणिस्तानातून आयात केली जायची. याशिवाय विविध नैसर्गिक पदार्थांपासून अनेक तर्‍हांची दारू बनविण्याची कला वन्य जमातींमध्ये अनेक शतकांपासून चालत आलीये. भारतात कलाल समाजाचा पारंपारिक व्यवसाय दारू बनवणे हाच होता.

कालिदासाच्या शाकुंतल, कुमारसंभव तसेच रघुवंश या ग्रंथांत दारूचा उल्लेख आहे परंतु समाजात कधीच दारु विक्रीला किंवा सेवनाला प्रतिष्ठा नव्हती.

दारूबद्दल सविस्तर

दारू हे एक अल्कोहोलयुक्त पेय आहे. मराठी बोलीभाषेमध्ये दारुला “मद्य” असेही संबोधले जाते. दारुचे जगभरातील सर्वच देशांमध्ये सेवन केले जातं तरी प्रत्येक देशाचे दारूसेवनाबाबत वेगळे कायदे आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये मद्यानासाठी किमान १८ वर्षे वय असणे बंधनकारक आहे व बहुतांशी देशांमध्ये दारूपान करून वाहन चालवणे हा कायदेशीर गुन्हा समजला जातो.

माफक दारूपानामुळे आरोग्यावर परिणाम होत नसला तरीही अतिदारूपानामुळे जगात दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडतात. दारूचे रासायनिक नाव इथॅनॉल असे आहे.

दारुचा शरिरावर काय होतो परिणाम

  • दारू डोक्याच्या केसापासून पायाच्या नखांपर्यंत नुकसान पोहचवते
  • दारुमुळं सर्वात मोठा परिणाम झोपेवर होतो. झोपेची सवय बिघडते.
  • दारूमुळं अल्सर होण्याच्या शक्यता जास्त वाढतात.
  • शरिराची पोषणद्रव्ये शोषण्याची क्षमता कमजोर होते.
  • कँन्सर होण्याची शक्यता वाढते.
  • लिव्हरच्या आजारात वाढ होते.
  • दारूचे प्रमाण वाढवले तर विचार करण्याची क्षमता कमी होते.
  • साखर असणाऱ्यांमध्ये साखरेचे प्रमाण वाढते.

दारु सुटणं शक्य आहे का?

योग्य उपचार घेतल्यास दारू सुटणे शक्य आहे. यातला पहिला उपाय तर दारु कायमची सोडणे हा आहे. दुसरा उपाय डिटॉक्सिनचा म्हणजे शरिरातून दारू बाहेर काढण्याची प्रक्रिया आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे कुटुंब, मित्रपरिवार आणि व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेऊन दारुपासून सुटका करुन घेणे.

ही बातमी पण वाचा : डिप्रेशनमध्ये आहात ? कशाला टेंशन घेताय, प्रत्येकाला असं कधी न कधी वाटतंच ! फक्त 2 मिनिटं काढा आणि वाचा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER