संपूर्ण वीजबिल भरल्यास 2 टक्के सूट मिळणार – ऊर्जामंत्री नितीन राऊत

वर्क फ्रॉम होममुळे वीजबिल वाढलं

Nitinn raut

मुंबई : लॉकडाऊनमध्ये संपुर्ण देशवासी घरात होते. तसेच, उन्हाळ्याचे दिवसही त्यातच अनेकांचे घरातून काम सुरू होते त्यामुळे विजेचा वापर अधिक झाल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. लॉकडाऊन नंतर आता विज बिल देण्यात येत आहेत. ही बिलं अधिक वाढून आल्याची ग्राहकांची तक्रार आहे या तक्रारीचे निवारण करण्याच्या उद्देशाने नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती.

पत्रकार परिषदेत राऊत यांनी अनेकांच्या मनातील उत्तर दिली. ते म्हणाले, थकीत वीजबिल तीन महिन्यांच्या टप्प्यात भरण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच संपूर्ण वीजबिल भरल्यास 2 टक्के सूट मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

काय म्हणाले राऊत –

विजेच्या बिलासंदर्भात लोकांच्या मनात संभ्रम आहेत. MERC ने घरोघरी जाऊन रीडिंग घेतलेलं नाही. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचे सरासरीपेक्षा कमी मीटर घेऊन एप्रिल, मे महिन्यात बिल आकारण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात एप्रिल व मे महिन्यात वर्क फ्रॉम होममुळे वीज वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या वीज दरात वाढ दिसून येत आहे, असं नितीन राऊत यांनी म्हटलं. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता क्षेत्रीय कार्यालयात मदत केंद्रात नेमलेले आहेत. त्यानुसार ग्राहकांना समजवण्याचं काम सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले.

ग्राहकांसाठी सवलती अशा असतील –

  • थकीत वीजबिल तीन महिन्यांच्या टप्प्यात भरण्याची मुभा देण्यात येत आहे.
  • एक तृतीयांश बिल भरले तरी वीज कापण्यात येणार नाही.
  • संपूर्ण वीज बिल एकत्र भरल्यास 2 टक्के सूट देण्यात येईल.
  • जे लोकं घर सोडून बाहेर होते, त्यांची माहिती मिळाल्यास त्यांच्या मीटरमध्ये करेक्शन करून रिडींग घेतली जाईल.
  • वीज मीटर बिघाड झाला असल्यास दुरुस्ती करून देण्यात येईल.
  • महावितरण कार्यालयात जाण्याची कोणतीही गरज नाही.
  • ज्या ग्राहकांनी या अगोदर संपूर्ण रक्कमेच्या वीजबिल भरले असल्यास त्यांना देखील ती सूट देण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER