‘तुम्ही काहीच केले नाही तर…’ पार्थचे शरद पवारांना सूचक उत्तर

Sharad Pawar & Parth Pawar.jpg

मुंबई : पार्थ पवार (Parth Pawar) हे राष्ट्रवादीच्या नेत्यांमधले एक चर्चित नाव आहे. संवेदनशील विषयांवर पक्षाच्या महत्त्वाच्या धोरणापेक्षा वेगळी भूमिका घेऊन त्यांनी माध्यमांना त्यांची दखल घ्यायला भाग पाडले. यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांना फटकारले. पण, या संदर्भात गांधी जयंतीनिमित्त – ‘तुम्ही जेव्हा एखादी कृती करता तेव्हा त्याचे परिणाम केव्हा येतील हे तुम्हाला काहीच माहीत नसते.

पण तुम्ही काहीच केले नाही तर त्याचे परिणाम काहीही मिळणार नाहीत.’ हा गांधीविचार ट्विट करून मी याच मार्गाने चालत राहणार, असा इशारा दिला आहे. आधी लोकसभेच्या मावळ निवडणुकीत ते चर्चेत आले. ही निवडणूक ते हरले. पण नंतर अयोध्येतला राम मंदिराचा प्रश्न, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी या विषयावर पक्षाच्या धोरणापेक्षा वेगळी भूमिका घेऊन त्यांनी माध्यमांना त्यांची दखल घ्यायला भाग पाडले. यासाठी शरद पवारांनी त्यांना  फटकारले. आता, मराठा आरक्षणासाठी त्यांनी न्यायालयात जाण्याचा संकेत दिला.

यावरही पवारांनी – या प्रश्नावर सरकार कोर्टात गेले आहेत. त्यावरही आणखी कुणी जात असेल तर जावे, दहा जणांनी जावे असे म्हणून नाव न घेता पार्थचा कान पिळला. यावर पार्थने त्यांना उल्लेखित ‘गांधीविचारा’ने उत्तर दिले आहे. राजकारण हा लांब पल्ल्यांचा खेळ असल्याने त्यात मागे राहून चालत नाही. सतत सक्रिय राहावे लागते. त्यामुळे पार्थ यांनी आपली पुढची दिशा काय राहणार याचे संकेत दिले, असे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER