… नियम करावे लागले तर केंद्र सरकारच्या नावाने शंख करू नका – आशिष शेलार

Ashish Shelar

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग (Sushant Singh Rajput) याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या आक्षेपार्ह वृत्त संकलनामुळे महाराष्ट्र सरकार (Maharashtra Govt) अस्वस्थ झाले आहे. या संदर्भात शिवसेनेच्या (Shivsena) ‘मुंबई पोलिसांचा अपमान’ लाईनवर काही माजी आयपीएस अधिकारी (IPS officers) न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने यात केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला प्रतिवादी केले आहे. यानंतर केंद्र सरकारला वृत्तांकनाबाबत काही नियम करण्याची वेळ येऊ शकते. ते महाराष्ट्र सरकारला गैरसोईचे ठरले तर ओरडू नका, असा इशारा भाजपाचे आमदार आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी दिला आहे.

याबाबत शेलार यांनी ठाकरे सरकारला डिचवणारे ट्विट केले आहे –

वृत्त वाहिन्यांचा त्रास होतोय बांद्र्याच्या साहेबांना..
न्यायालयात गेलेत माजी आयपीएस अधिकारी…
प्रश्न विचारतात समाजवादी..
न्यायालयाने प्रतिवादी केलेय
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला…

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे –

आता केंद्र सरकारला न्यायालयाच्या आदेशानुसार
वृत्त वाहिन्यांच्या वृत्तांकनाबाबत नियम करावे लागले तर..
केंद्र सरकारच्या नावाने शंख करु नका!

हे संदर्भ जपून ठेवून द्या…
भविष्यात अग्रलेख लिहीताना लागू शकतात!

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, अभिनेता सुशांत सिंग याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या तपासात दोन महिने मुंबई पोलीस काहीही शोधू शकली नाही. साधा एफआयआरही दाखल केला नव्हता! सीबीआयने मात्र १५ दिवसात अनेक खळबळजनक गोष्टी शोधून काढल्यात.

काही वृत्त वाहिन्यांनीही स्वतःची शोध मोहीम सुरू केली. त्यात ते आक्रमकपणे उघड करत असलेली माहिती राज्य सरकारला अस्वस्थ करणारी आहे. या प्रकरणी न्यायालयात गेलेले अधिकारी आणि इतर डाव्या विचारसरणीचे आहेत, असा आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER